Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने धुम्रपानाबाबत जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने विविध शाळांमधून धुम्रपानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

_MPC_DIR_MPU_II

हे अभियान शहरातील एकूण नऊ शाळांमधून राबविण्यात आले असून त्यात २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या अभियानातून प्रभावित होऊन ३०० विद्यार्थ्यांनी व्यसनाला निरोप दिला. डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, कमल नयन बजाज स्कूल, विद्यानंद भवन स्कूल, सेंट उर्सुला ज्युनिअर कॉलेज, नॉव्हेल हॉटेल मॅनेजमेंट, नॉव्हेल ज्युनिअर कॉलेज, सिटी प्राईड कॉलेज, मॉडर्न ज्युनिअर कॉलेज या कॉलेजमधून  धुम्रपानाबाबत जनजागृतीबाबत अभियान राबविण्यात आले.  हे अभियान रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने राबविण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा व युथ डायरेक्टर दीपा जावडेकर आदी सदस्य उपस्थित होते.

कर्करोगतज्ज्ञापासून हृदयविकारतज्ज्ञापर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ धुम्रपान व तंबाखू सेवनाने बाधित रुग्ण तपासतच असतात. म्हणजेच धूम्रपान व तंबाखू यांचे विकार हे केवळ तोंड अथवा फुफ्फुसे यातच मर्यादित नसून इतर अनेक व्याधींसाठी कारणीभूत ठरतात. तरी धुम्रपान करणे टाळावे, अशी जनजागृती शहरातील विविध शाळांमधून रोटरी क्लब ऑफ प्राधिकऱणच्या वतीने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.