Pimpri : नवोदित वकिलांची पोलीस पडताळणी तात्काळ करण्याची वकिलांची मागणी

एमपीसी न्यूज – नव्याने विधी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नवोदित वकीलांचे पोलीस पडताळणी तात्काळ करावी. त्याबाबत संबंधित कर्मचा-यांना योग्य त्या सूचना देण्य़ात यावी. जेणे करुन मिळण्याबाबत पिंपरी-चिंचवडचे अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.राजेश पुणेकर यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्नमनाभन यांच्याकडे लेखी निवेनांद्वारे केली.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरांमधून दरवर्षी साधारण शंभर ते दोनशे विद्यार्थी विविध महाविद्यालयांमधून शिक्षण पूर्ण करुन वकिली व्यवसाय चालू करत आहेत. या विद्यार्थ्यांना शेवटचे वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • ही बाब स्तुत्य असली तरी पडताळणीसाठी बराच व अवास्तव वेळ लागत असून नवोदित व नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संसंभिदत पोलीस स्टेशन व आयुक्त कार्यालयाचा अवास्तव पाठपुरावा करावा लागत आहे. तरी पोलीस पडताळणी जलद गतीने करण्यात यावी.

निवेदन देताना पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. राजेश पुणेकर, अ‍ॅड. सुहास पडवळ, अ‍ॅड. गणेश शिंदे, अ‍ॅड. अतुल अडसरे, अ‍ॅड. अतिश लांडगे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.