Dighi : एलईडी टीव्ही चोरून नेताना चोरटा रंगेहाथ पकडला

एमपीसी न्यूज – घरातून एलईडी टीव्ही चोरून नेताना चोरट्याला घरातील मंडळींनी रंगेहाथ पकडले. चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी पावणे दोनच्या सुमारास आळंदी रोडवरील जुन्या पुलाजवळ घडली.

सोमनाथ अशोक बागुळगे (वय 18, रा. तांबळगाव शिरूर, लातूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश रघुनाथ तापकीर (वय 50, रा. आळंदी ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटा सोमनाथ बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुरेश यांच्या घरात शिरला. त्याने घरातील 27 इंची एलईडी टीव्ही चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीव्ही चोरून नेत असताना त्यांना रंगेहाथ पकडले. त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.