Dighi Crime : महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 ऑगस्ट रोजी दुपारी आदर्शनगर, दिघी येथे घडला. याबाबत 1 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू भास्कर लहाने (वय 25, रा. आदर्शनगर, दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी दुपारी आरोपी राजू आणि त्याचे वडील भास्कर लहाने यांचे जोरजोरात भांडण सुरु होते. आरोपी आणि फिर्यादी समोरासमोर राहतात. त्यामुळे राजू याची आई आणि बहिण यांनी भांडण सोडविण्याच्या मदतीसाठी फिर्यादी महिलेला बोलावले. फिर्यादी महिला त्यांच्या गॅलरीत आल्या असता राजू याने त्यांना विनाकारण अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली.

याबाबत फिर्यादी महिलेने दिघी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून 1 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.