Dighi Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एकत्र केलेल्या जमीन खरेदीच्या व्यवहारात पैसे देणे-घेण्यावरून चौघांनी तरुणाला लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली आहे.(Dighi Crime) हि घटना रविवारी (दि.30) रात्री डुडुळगाव येथील साठेनगर परिसरात घडली.


याप्रकरणी दिगंबर बाळासाहेब काटे (वय 30 रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विजय तारासिंग चव्हाण (वय 38 रा. डुडुळगाव), अर्जून मोतीराम राठोड, विनोद मोतीराम राठोड व करण दामू राठोड यांच्यावर दिघी पोलीस (Dighi Crime) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार निवृत्त होणार, समिती स्थापन करणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मयत मित्र रमेश तारासिंग चव्हाण व फिर्यादी यांनी 2021 मध्ये निवासी प्लॉट खरेदी केली होती. यावेळी मयत रमेश यांचा भाऊ विजय याने व्यवहारातील पैसे देवाण-घेवाणीचा वाद वाढवून चर्चे करिता फिर्यादीला बोलावले व फिर्यादीला इतर साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉड व लाकडाने मारहाण करत जखमी केले.यावरून दिघी पोलीस (Dighi Crime) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.