Chinchwad : सराईत गुन्हेगारास लातूर मधून अटक

एमपीसी न्यूज – रावेत येथे जबरी चोरी करून पळालेल्या सराईत ( Chinchwad)  गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लातूर येथून अटक केली. या आरोपीवर सात गुन्हे दाखल आहेत. प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय 32, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 एप्रिल रोजी 37 वर्षीय महिला सकाळी चालण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. चालत घरी जात असताना सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास चंद्रभागा कॉर्नर, रावेत येथे फिर्यादी महिला आल्या असता त्यांच्या मागून अनोळखी व्यक्ती चालत आला. त्याने फिर्यादीच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादींनी आरडाओरडा केला असता एक बुलेटस्वार फिर्यादीजवळ आला. मी चोराला पकडतो, असे म्हणून बुलेटस्वार चोराच्या जवळ जाऊन त्याला घेऊन पळून गेला.

Chikhali :  जाधववाडीत ‘ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ‘

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथकाने केला. पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली. पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे आणि आशिष बोटके यांना माहिती मिळाली कि, हा गुन्हा रामा पाटील आणि पांडा सुतार यांनी केला आहे. त्यातील पांडा सुतार हा लातूर येथे आहे.

त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने लातूर येथे जाऊन सापळा लाऊन प्रदीप उर्फ पांडुरंग सुतार याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा रामा पाटील याच्यासोबत मिळून केला असल्याचे सांगितले.

पांडुरंग सुतार हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात दरोडा, जबरी चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि वाहन चोरी असे सात गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला रावेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रावेत पोलीस ( Chinchwad) तपास करीत आहेत.

ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे,  प्रदीप गोडांबे, आशिष बोटके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.