Dighi : पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याने तरुणाकडून दोन लाखांचा ऐवज हिसकावला

एमपीसी न्यूज – पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर बोपखेल येथे घडली.

आशिष अजय शर्मा (वय 25, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरविंद रमेश जोगदंड (वय 28), अतिष शिंदे (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष यांनी आरोपींना पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये दिले नाहीत. या कारणावरून आरोपी अरविंद याने लोखंडी पालघन आणि आरोपी अतिष याने कोयत्याने मारहाण केली. आशिष यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची दोन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी आणि पाच हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.