Dighi: शिवसेना दिघी शाखा व वाळके प्रतिष्ठानकडून एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान

शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याकडून विभागप्रमुख संतोष वाळके यांचे कौतूक

एमपीसी न्यूज – शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान, कै. सुजाताताई एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या वतीने लॉकडाऊनच्या कालावधीत एक लाखाहून जास्त गरजूंना अन्नदान केले आहे. दिघी विठ्ठलमंदिर शेजारी सुरु केलेल्या अन्नदानाचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कौतूक केले. यामध्ये शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिघी येथील शिवसेना विभागप्रमुख संतोष तानाजी वाळके यांना फोन करून लॉकडाऊन काळात आजपर्यंत गरजू नागरिकांना केलेल्या अन्नदान व मदतीचे कौतूक केले. तुमच्या या कार्याची नोंद घेऊन तसे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देऊ, असे सांगितले.

त्याचबरोबर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील संतोष वाळके यांनी केलेल्या अन्नदानाबाबत समाधान व्यक्त करत कौतुक केले.

कोरोना – कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यात  देशभर लॉकडाऊन केले. त्यामुळे देशभरातील गोरगरीब नागरिकांचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले. तसेच कष्टकरी कामगारांचे, रोजंदारी कामगारांचे, छोटे व्यावसायिक, फेरीवाले, टपरीवाले, पथारीवाले यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला.

या गरजू नागकिरांना कर्तव्य म्हणून शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके प्रतिष्ठान, कै. सुजाताताई एकनाथ वाळके प्रतिष्ठानच्या वतीने रोज दोनवेळ मोफत अन्नदान करण्यात आले. त्याचा नुकताच समारोप करण्यात आला.

यावेळी पहाटे दिघीगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात संतोष वाळके यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी 10 नंतर दिघी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ माजी सरपंच साहेबराव वाळके, माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, चंद्रकांत साहेबराव वाळके तसेच माजी उपसरपंच पांडुरंग नाना वाळके, म्हस्कूजी वाळके, कुंडलिक परांडे, रामदास परांडे, मंडलाधिकारी सुरेश भिकाजी वाळके, शिवसेनाविभाग प्रमुख कृष्णा वाळके, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर वाळके, चंद्रकांत वामनराव वाळके, दत्तात्रय हरीभाऊ वाळके, सुरेश वामनराव वाळके, मधुकर देवकर, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष सुधाकर भोसले, संतोष घोलप, शशिकांत वाळके, नवनाथ परांडे, संदीप वाळके, दिनेश तुपे, गौरव आसरे, सुरज वाळके यांच्या हस्ते समारोपाच्या दिवशीचे गोड अन्नदानाचे वाटप करण्यात आले.

तसेच संयोजक संतोष वाळके, लक्ष्मण तुपे आणि या कार्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचा दिघी गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लॉकडाऊन काळात दिघी परिसरातील दोनशेहून जास्त रिक्षाचालक, चप्पल बूट पॉलिश करणारे गटई कामगार, घरकाम करणा-या महिला, सलूनमधील कामगार यांना किराणामालाचे किट देण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे पुणे परिसरात शिक्षण घेत होते. त्यांना पुन्हा उस्मानाबादला जाण्यासाठी संतोष वाळके यांनी आर्थिक मदत व मार्गदर्शन केले.

याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संतोष वाळके यांनी केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भोसरीतील एका कुटुंबातीलदोन मुले लातूरला उच्च शिक्षणासाठी होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांची आई लातूरला गेली होती. आणि दुस-याच दिवशी लॉकडाऊन सुरु झाले. त्या मुलांना व आईला पुन्हा भोसरीत  आणण्यासाठी संतोष वाळके यांनी मदत व मार्गदर्शन केले.

तसेच दिघी भोसरी परिसरात मध्य प्रदेशातील अनेक कामगार रेल्वेने  मध्यप्रदेशला निघाले होते यातील भोसरीतील 168 मजूरांना मास्क, सॅनिटायझर व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

पहिल्या दिवशी 100 पाकिट वाटून सुरु केलेल्या या अन्नदान यज्ञात समारोपाच्या दिवसापर्यंत एक लाखाहून जास्त  नागकिरांना अन्नदान करण्यात आले. तसेच दिघी परिसरातील पोलिस व अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना सॅनिटायझर आणि  मास्कचे वाटप करण्यात आले.

दिघीतील विठ्ठलमंदिर येथे रोज दुपारी 12 ते 3 या वेळेत आणि सायं. 6 ते 9 या वेळेत अन्नाचे  पाकिट वाटप करण्यात येते होते. तसेच दिघी गावठाण, साई पार्क, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी, आदर्शनगर, महादेवनगर, बीयू  भंडारी सोसायटी परिसर, चौधरी पार्क, गायकवाडनगर, काटे वस्ती या परिसरात रिक्षातून अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली.

  या अन्नदान कार्यात दिघी ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्तींनी रोख व वस्तूस्वरूपात मदत केली.  यांचे संतोष वाळके यांनी समारोपप्रसंगी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.