Dighi : भरदिवसा घर फोडले; सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – भरदिवसा बंद घराचा दरवाजा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी दहा ते दुपारी सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान साई पार्क रोड, दिघी येथे घडली.

नागनाथ खंडेराव भोरे (वय 46, रा. साई पार्क रोड, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोरे दिघी परिसरात व्यवसाय करतात. ते शनिवारी सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रदेश केला. घरात ठेवलेले 57 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. भोरे दुपारी सव्वा तीन वाजता घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार त्यांनी त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.