Dighi : जुन्या केसवरून दोघांमध्ये मारहाण, पोलिसात परस्पर विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज – केस मागे घे म्हणत महिला व एका (Dighi )व्यावसायीकामध्ये भांडणे व मारहाण झाली आहे. यातून दोघांनीही दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.7) चोवीसवाडी परिसरात घडली.

याप्रकऱणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Dighi )आहे. यावरून दत्ता कारभारी कायंदे (वय 37 रा. दिघी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी यांच्या घरात घुसून यापुर्वी केलेली केस मागे घे म्हणत आरोपीने शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

Pimpri : पुलाचे काम संथगतीने, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

तर दत्ता कायंदे यांनीही संबंधीत महिले विरोधात तक्रार दिली असून, महिलेने जुनी केस संदर्भात बोलण्यासाठी घरी बोलावून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली, हाताला चावा घेतला व लोखंजी रॉड पायावर मारून कायंदे यांना जखमी केले. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.