Dighi : हातचलाखीने सोन्याच्या दोन बांगड्या पळवल्या

एमपीसी न्यूज – तांबे पितळीची भांडे पाॅलिश करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या दोन सोन्याच्या बांगड्या पळवल्या. ही घटना समर्थ नगर, दिघी येथे गुरुवारी (दि. 4) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

अनुसया मारुतल पोवार (वय 46, रा. समर्थ नगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन इसम गुरुवारी अनुसया यांच्या घरी आले. त्यांनी त्यांच्याकडे तांबे पितळेची भांंडी पाॅलिश करण्यासाठी उजाला पावडर आहे, असे सांगितले. पावडर दाखवत असताना दोघांनी अनुसया यांच्या हातातील 75 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने काढून घेतल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.