Dighi Crime News : टेम्पो पाठीमागे घेण्याच्या कारणावरून वाद; पती-पत्नीस मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाड्याने राहण्यासाठी घरगुती साहित्य घेऊन आलेल्या कुटुंबासोबत शेजारी राहणाऱ्या महिलेने भांडण केले. त्यावर भांडणाऱ्या महिलेस समजावून सांगत असताना तिच्या तीन नातेवाईकांनी घर मालक पती-पत्नीस मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी परांडेनगर, दिघी येथे घडली.

फय्याज मोमीन (वय 45), रेश्मा फय्याज मोमीन (वय 42, दोघे रा. परांडेनगर, दिघी), झाकीर (वय 35, पूर्ण नाव माहिती नाही), इंतीयाज मोमीन (वय 40, रा. दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बाळू आत्माराम दास (वय 48, रा. परांडेनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी दास यांच्या घरात गारगोटे कुटुंब भाड्याने राहण्यासाठी आले होते. गारगोटे कुटुंबाने टेम्पोमधून त्यांचे साहित्य आणले होते. साहित्य खाली करण्यासाठी टेम्पो पाठीमागे घेत असताना आरोपी रेश्मा हिने भाडेकरू गारगोटे, टेम्पो चालक आणि फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ केली.

त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नी आरोपी रेश्माला समजावून सांगत असताना अन्य आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी यांना मारहाण करताना भांडण सोडवण्यासाठी त्यांच्या पत्नी आल्या असता आरोपी इंतीयाज याने लोखंडी रॉड डोक्यात मारून त्यांना जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.