Pimpri : राष्ट्रतेज मित्र मंडळा तर्फे एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय मागील काही दिवसांपूर्वी लागू केला. मात्र, त्याची अंमलबजावणी दिवसेंदिवस कमी होत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसत आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी नेहरूनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाच्या वतीने एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले.

मंडळाने स्वखर्चाने एक हजार कापडी पिशव्या बनविल्या. मंडळातील कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या पिशव्यांचे वाटप केले. तसेच प्लास्टिक बंदी, प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मोडक, कार्याध्यक्ष अजय पाताडे, सचिव सुनील सावंत, मंगेश कुलकर्णी, संजय सावंत, अमोल मोडक, सचिन सावंत, महादेव वाघ, दीपक सावंत, रोहन पाटील, मंदार कुलकर्णी, बाळा गुरव, अनिल सावंत, सुजित पाटील, प्रल्हाद पाटील, रसिका मोडक, गायत्री सावंत, अक्षता पाताडे, श्रुती सावंत, सविता वाघ, रुचिता मोडक, मधुरा कुलकर्णी, राधिका भोसले, मानसी सावंत, गीतांजली मोडक, अक्षता चिंदरकर, अंजली पवार, प्रणिता कुलकर्णी, सुजाता चांदगुडे, मनाली पाताडे आदी उपस्थित होते.

प्लास्टिक जमिनीवर पडले तर ते कुजत नाही आणि त्याचे खतही तयार होत नाही. उलट प्रदूषणात वाढ होते. जागतिक तापमानवाढीत प्लास्टिकचा मोठा वाटा आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केली, त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली. सुरुवातीला प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळण्यावर सर्वच स्तरातून भर देण्यात आला. मात्र, कालांतराने ही अंमलबजावणी ढीसाळ झाली. त्याबाबतही यावेळी जनजागृती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.