Document Validity Extended : वैधता संपलेल्या वाहन कागदपत्रांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – वैधता संपलेल्या वाहन कागदपत्रांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. कोरोनाकाळातील ही पाचवी मुदतवाढ आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये वैधता संपलेल्या लायसन्स, परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र आणि अन्य वाहन कागदपत्रांना यापूर्वी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्राने मुदतवाढीचे नवे आदेश शुक्रवारी काढले आहेत.

1 फेब्रुवारी 2020 ते 30 जून 2021 या काळात वैधता संपलेली वाहन कागदपत्रे 30 जूनपर्यंत वैध धरली जावीत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हे आदेश लागू राहणार आहेत, असे केंद्राने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. वैधता संपल्याने तणावात असलेल्या वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.