Chinchwad : चिंचवड येथील घाटावर 1853 गणेश मूर्तींचे दान

एमपीसी न्यूज – पर्यावरण रक्षणाच्या सामाजिक (Chinchwad) जाणिवेतून सुरू केलेल्या गणेश मूर्ती दान उपक्रमाला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (दि. 25) गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी बहुतांश घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. चिंचवड घाटावर राबविण्यात आलेल्या मूर्तीदान उपक्रमात सोमवारी 1853 गणेश मूर्तींचे दान मिळाले.
गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद –
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी चिंचवड महापालिका, डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम विसर्जनाच्या सातव्या दिवशी राबविण्यात आला.
गणेशोत्सव विसर्जनाच्या सातव्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत हाॕटेल रिव्ह्यु घाट बिर्ला हाॕस्पिटलरोड चिंचवडगाव येथे मूर्ती दान उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ पासून रात्री 12 वाजेपर्यंत 1853 मुर्तीचे दान मिळाले आणि सुमारे सहा टन निर्माल्यदान मिळाले.
Chinchwad : माथाडी कामगारांसाठी अण्णासाहेब पाटील यांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे – इरफान सय्यद
ब प्रभाग अधिकारी अमित पंडित आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण दहा दिवस राबवला जात आहे. शिफ्ट प्रमाणे (Chinchwad) सभासदांची निवड करुन मुर्तिदान आणि निर्माल्य संकलन केले जात आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भरत शिंदे, मनोहर कड, शब्बीर मुजावर, प्रभाकर मेरुकर, सुशिलकुमार गायकवाड, संजित पद्मन, यश ढवळे, विश्वास राऊत, अरुण कळंबे, अभिजित पाटील, रमेश भिसे, महेंद्र जगताप, स्वप्निल सुतार, बाजिराव पतंगे, उमेश गुर्जर, विनोद काळे, हितेश पवार, पुजा पुराणिक, सुनिता गायकवाड, स्मिता पद्मन, मनिषा आगम, विजय आगम, कविता वाल्हे, मनपाचे चेतन देसले, सचिन घनवट, प्रतिक जगताप, रमेश कापुरे, शैलेश पोळ यांनी परिश्रम घेतले.
मागील वर्षापेक्षा 143 मुर्तीचे दान अधिक मिळाले. मागील वर्षी सातव्या दिवशी 1710 मूर्तींचे दान मिळाले होते. निर्माल्यदान घेण्यासाठी संस्कार संस्कृती सद्भावना महिला बचत चिंचवडेनगर यांनी मदत केली.