Maval : टाकवे येथील शिवशाही मंडळाकडून ग्रामीण भागात गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Maval) टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळाने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भक्त पुंडलिक हा देखावा सादर करण्यात आला. शिवशाही मंडळाने ग्रामीण भागात गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखली आहे. केवळ गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर शिवशाही मंडळ सामाजिक उपक्रम राबवत असते.

विविध सामाजिकउपक्रम राबवत धार्मिक संदेश देण्यावर अग्रस्थानी असलेले टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळाने यंदा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भक्त पुंडलिक देखावा सादर करत महोत्सवी परंपरा जपली आहे.

शिवशाही मित्र मंडळ टाकवे यांच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आरोग्य शिबिर,पोस्ट (Maval ) विम्याचे कवच वाटप, पोलिस सेवेत भरती झालेल्या युवकांचा सत्कार, गावातील नागरिकांना चष्मे वाटप, वेटलीफ्टींग स्पर्धेचे आयोजन असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Chinchwad : चिंचवड येथील घाटावर 1853 गणेश मूर्तींचे दान

या विविध सामाजिक उपक्रमासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मोढवे, उपाध्यक्ष रोहिदास खुरसुले, स्वामी जगताप, योगेश मोढवे,दिलीप आंबेकर ,बाबाजी असवले, नवनाथ आंबेकर यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते सतत राबत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.