Pimpri : विद्यार्थ्यांना खोली भाडे देण्यासाठी सक्ती नको ; आप युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Don’t force students to pay the rent of room demand of AAP Youth to the Chief Minister Uddhav Thackrey

एमपीसी न्यूज – खोली भाडे द्या अन्यथा खोली खाली करा असा दबाव काही खोली मालक विद्यार्थ्यांवर करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खोली भाडे देण्यासाठी सक्ती करु नये अशी मागणी आप युवा आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

आप युवा आघाडीच्या माध्यमातून भाडे तत्वावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  मुख्यमंत्र्यांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत.

# जे रूम मालक विद्यार्थ्यांवर ‘भाडे द्या अन्यथा सामान घेऊन जा’ असा दबाव टाकत आहेत त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी.
# विद्यार्थी आणि रूम मालक यांच्यात जो काही भाडे करार झाला असेल त्यातुन “एप्रिल 2020” या महिन्यापासून ते प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष चालू   होईपर्यंत, म्हणजे त्या खोलीचा प्रत्यक्ष वापर होईपर्यंत मधल्या कालावधीत कोणतेही भाडे आकारु नये.
# खोली मालकांना सरकारने योग्य ते आर्थिक पॅकेज जाहीर करावे

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मुळे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच जर सरकार कामगार कायदे गुंडाळू शकते तर विद्यार्थ्यांना भाडेकरारात सूट का देऊ शकत नाही असा सवाल आप युवा आघाडीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.