Pimpri : पालकमंत्र्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या उद्घाटनाला आक्षेप

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा आक्षेप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना बोलवण्यात आले आहे. (Pimpri) पाटील यांना आमंत्रित करून पालिका जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांच्या हस्ते उद्घाटनाला सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आक्षेप घेतला आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात काळभोर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला महापालिकेने प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित केले आहे.

PMC : नदी पुनरुज्जीवनाच्या खोदकामात सापडले ब्रिटिशकालीन वस्तू

या प्रकाराने संपूर्ण आंबेडकरी समूहात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही महिन्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड शहरात महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्या प्रकरणी चंद्रकांत पाटील (Pimpri) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच महापालिका चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करून खोडसाळ प्रकार करून जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाज पिंपरी- चिंचवड शहरच्या वतीने निषेध करीत आहोत.

आपण या प्रकरणात लक्ष घालून चंद्रकांत पाटील यांना (Pimpri) कार्यक्रमात उपस्थित राहण्यास मज्जाव करावा. अन्यथा आम्ही चंद्रकांत पाटील यांचा लोकशाही मार्गाने सनदशीरपणे विरोध करू याची नोंद घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.