Lonavala : अतिवृष्टीमुळे दुधीवरे खिंडीतील राडारोडा रस्त्यावर, खिंडीत वाहतूक कोंडी

राडारोडा त्वरित उचलण्याची मागणी

एमपीसी न्यूज – दुधीवरे खिंड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संतत धार पाऊस पडत आहे. दुधीवरे खिंडीतील राडारोडा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यातच खिंडीत रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे रस्त्यावर पडलेला राडारोडा त्वरित उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

मागील पावसात रस्त्यावर आणि कडेला पडलेला राडारोडा सार्वजनिक बांधकाम विभागाने न काढल्याने रस्त्याची साईडपट्टी पूर्ण बंद झाली. त्यामुळे पाणी रस्त्यावर आले. परिणामी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच दुधीवरे खिंडीत रस्ता अरुंद आहे त्यामुळे आज येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.

पवनानगर हे नवीन पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत असून या परिसराकडे पर्यटकांची ओढ जास्त असते. तसेच मुंबईहून लोणावळ्यामार्गे पवनानगर येण्यासाठी हा जवळचा आणि सोयीस्कर मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर पडलेला राडारोडा त्वरीत उचलण्याची मागणी संतोष मोरे, विश्वास टाकवे, साईनाथ केदारी,विकी धानिवले, पोपट शिंदे, अनिल साबळे, इंद्रजित पडवळ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.