Chinchwad : भूमकर चौकात रस्त्यावर तेल सांडल्याने 30 ते 35 वाहने घसरली

एमपीसी न्यूज – भूमकर चौकात आज सायंकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावर अज्ञात वाहनातून मोठ्या प्रमाणात तेल सांडून 30 ते 35 वाहने घसरली. त्यामुळे अनेक वाहन चालक जखमी झाले. दरम्यान, अग्निशामक दलाने माहिती मिळताच संपूर्ण रस्ता धुवून काढला. त्यांना थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यामुळे मोठा अपघात टळला. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहाच्या सुमारास भूमकर चौकात एका अज्ञात वाहनातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले. यामुळे 30 ते 35 वाहन घसरून वाहन चालक जखमी झाले. तेथील अभिजीत जाधव या सजग नागरिकाने या घटनेची माहिती सोशल फाउंडेशनला दिली. माहिती मिळताच फाउंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी अग्निशामक दलाला याबाबत कळविले. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने भूमकर चौकात येऊन संपूर्ण रस्ता धुवून काढला.

दरम्यान, अग्निशामक दलाच्या येईपर्यंत सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक दुसरीकडून वळवली. तसेच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली. तसेच वाहतूक पोलिसांची देखील अग्निशामक दलाला खूप मदत झाली. रस्ता संपूर्ण धुवून व्यवस्थित झाल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.