Nigdi : पीएमपीएलच्या निगडी बस स्थानकावरील रस्त्याच्या कामामुळे प्रवाशांचा खोळंबा

एमपीसी न्यूज – पीएमपीएलच्या निगडी येथील (Nigdi) पवळे उड्डाणपुलाखाली असलेल्या बस स्थानकावर रस्त्याचे काम सुरु असल्याने प्रवाशांना थांबण्यासाठी अडचणी येत आहे. मागील दोन महिन्यांपासून हे काम सुरु असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यातच रिक्षाही बस स्थानकावर येऊन प्रवासी भरतात. यामुळे देखील अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
निगडी येथील पवळेब्रिज थांब्यावर सकाळ , सायकाळच्या दरम्यान नोकदार, चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. निगडी बस थांब्याचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. निगडी हा बसथांबा रस्त्यावर असल्यामुळे दररोज या बसस्थानकावर वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामध्ये रिक्षाचालक बसस्थांकाच्या समोर रिक्षा उभी करत असल्यामुळे पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांकडून सतत सांगून देखील रिक्षाचालक त्याकडे दुलर्क्ष करतात.

निगडी थांब्यावर वेगात वाहने येतात. अनेक नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने पार्क करुन जातात. मात्र बसथांब्याचे काम सुरु असल्याने प्रवाशांना थांबण्यास जागा मिळत नसल्यामुळे प्रवासी ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहताना दिसत आहेत.अशा वेळी दुचाकी चारचाकी चालक, रिक्षाचालक मध्ये वाहन घेऊन येतात. त्यामुळे (Nigdi) प्रवाशांचा अपघात होऊ शकतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.