Easter Sunday : ईस्टर संडे साजरा करत ख्रिश्चन बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता

एमपीसी न्यूज – ख्रिस्तबांधवांनी पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच (Easter Sunday) ईस्टर संडे रविवारी (दि. 9) उत्साहात साजरा केला. रविवारच्या दिवशी मागील 40 दिवसांपासून सुरू असलेल्या उपवासाची सांगता झाली.

पवित्र वधस्तंभावर येशूने आपले प्राणार्पण केले. त्या दिवसाला ब्लॅक फ्रायडे म्हटले जाते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू पुनरुत्थित झाले. येशूने मरणावर विजय मिळविला त्यानिमित्त ईस्टर संडे साजरा केला जातो. शहरात विनियार्ड चर्च दापोडी, सेंट अँन्ड्य्रूज, सेंट मेरी खडकी, दि युनायडेट चर्च ऑफ ख्राईस्ट कामगारनगर, पिंपरीतील अवरलेडी कन्सोलर अप्लिकेटेड चर्च, चिंचवडमधील सेंट झेवियर चर्च, काळेवाडीतील सेंट अल्फान्सो चर्च, निगडीतील इनफंट जीझस चर्च, सेंट अन्थोनी चर्च, काळेवाडीतील केडीसी चर्च ऑफ ख्राईस्ट, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्चमध्ये ‘येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान’चे महत्त्व सांगणारा संदेश देण्यात आला.

सर्व चर्च पहाटेपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. (Easter Sunday) चर्चच्या महिला मंडळाने पहाटेची ‘सर्व्हिस’ केली. शहरातील विविध चर्चमधून ईस्टरच्या पूर्वसंध्येनिमित्त शनिवारी रात्री, तसेच रविवारी विशेष उपासना विधीचे आयोजन करण्यात आले होते. ईस्टर हा प्रभू येशूप्रती आपले प्रेम प्रकट करण्याचा खास दिवस असतो. ईस्टर संडेनिमित्त शनिवारी रात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत चर्च व ख्रिस्ती प्रेयर ग्रुपमध्ये भजनाचे आणि धार्मिक गीतांचे कार्यक्रम झाले.

Pune : जोरदार पावसात कोथरुडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा संपन्न

“जा सांगा मम बंधुजना…आलो जिंकुनिया या मरणा !”, मरण जिंकिले…येशू राजाने…’’अशी विजयी गीते म्हणत, चर्चमधील प्रार्थना आणि प्रवचनानंतर एकमेकांना ‘‘प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे,’’ ‘हॅपी ईस्टर’ अशा शुभेच्छा देत, भक्तिमय आणि उत्साही वातावरणात ईस्टर संडे साजरा झाला. शहरातील पिंपरी, भोसरी आणि देहूरोड परिसरात ख्रिस्ती बांधवांनी पुनरुत्थान रॅली काढली.

द युनायटेड पास्टर्स अँड लीडर्स ट्रस्टच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, लांडेवाडी, भोसरी येथून”पुनरुत्थान रॅली” काढण्यात आली. रॅलीचे 13वे वर्ष आहे. (Easter Sunday) यावेळी बिशप सम्युअल साखरपेकर, मायकलराज नाडार, प्रदीप चांदेकर, अनिश विजगत, डॉ. विजय फार्तडो, अशोक निकाळजे, डॉ. प्रवीण रणदिवे, विधी अधिकारी ऍड. प्रसाद सांगळे, ऍड. बाजीराव दळवी, पास्टर बन्यामिन काळे, अशोक त्रिभुवन, निलेश वानरे, सम्युएल बनकर डेव्हिड काळे आदींनी सहभाग घेतला.

ख्रिश्चन लीडर्स प्रेयर फेलोशिप (CLPF)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथून पुनरुत्थान रॅली काढण्यात आली. नेहरूनगर मार्गे अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी ते मोरवाडी मार्गे रॅली काढण्यात आली. मोठ्यासंख्येने ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला होता. पास्टर डॅनिएल अंथनी, पास्टर सुधीर पारकर, मोझेस वाघमारे, रोजी थॉमस, भगवान म्हात्रे, स्नेहल डोंगर दिवे, सुनील जाधव, रिचार्ड गजभिव, डेव्हिड श्रीसुंदर आदींनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.