Pune News: दुरुस्तीच्या कामामुळे पुणे-लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या येत्या मंगळवारपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – कामशेत रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी शनिवार (दि.10) ते मंगळवार (दि.13) या चार दिवसाच्या कालावधीत पुणे लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9 वाजून 55 मिनीटांची तर सकाळचीच 11 वाजून 17 मिनीटांची लोकल तसेच दुपारी तीन वाजता सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. याच कालावधीत पुण्याहून तळेगावसाठी दुपारी पावणे चार वाजता सुटणारी लोकल ही धावणार नाही.

Bhosari News: आशीर्वाद एंटरप्राइजेसला पुणे उद्योग भूषण पुरस्कार

त्याचप्रमाणे लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी लोकल, दुपारी साडे तीन वाजताची लोकल तर , संध्याकाळी साडे पाच वाजता सुटणारी लोकलही रद्द करण्यात येणार आहे. याबरोबरच तळेगाव वरून पुण्यासाठी दुपारी चार वाजून 40 मिनीटांनी सुटणारी लोकलही 10 ते 13 डिसेंबर या कालावधीत धावणार नाही.

मंगळवारी पुण्यावरून लोणावळ्यासाठी दुपारी 4 वाजून 25 मिनिटांनी सुटणारी लोकल आणि लोणावळ्यावरून संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पुण्याकडे सोडण्यात येणारी लोकलही रद्द करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून कळिवण्यात आले आहे.

रद्द करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये संध्याकाळी किंवा दुपारी लोणावळ्यातून सुटणाऱ्या आणि सकाळी पुण्यातून जाणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी यांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.