Bhosari News: आशीर्वाद एंटरप्राइजेसला पुणे उद्योग भूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज – भोसरीतील आशीर्वाद एंटरप्राइजेसला बेस्ट इंजिनिअरिंग कंपनी म्हणून पुणे उद्योग भूषण पुरस्कार मिळाला. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते संचालिका रंजना भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.

पुणे ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा व कंपनीचा ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन संस्थेच्या वतीने दरवर्षी सन्मान केला जातो. यंदा पिंपरी-चिंचवड मधील भोसरी, धावडेवस्ती येथील आशीर्वाद एंटरप्राइजेसला बेस्ट इंजिनिअरिंग कंपनी म्हणून पुणे उद्योग भूषण पुरस्कार देण्यात आला.

Nigdi News: सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!-ह.भ.प. श्रेयस बडवे

आशीर्वाद एंटरप्राईजेस ही कंपनी पंप आणि वॉल सर्व्हिसिंग बॉयलर मेंटनस मशीनिंग स्पेअर पार्ट या क्षेत्रात काम करते. त्या कामाची दखल घेत ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन यांच्यातर्फे पुणे उद्योग भूषण पुरस्कार देण्यात आला. संचालिका रंजना भोसले म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळण्याच्या मागे आशीर्वाद कंपनीचे सर्व ग्राहक, सहकारी व खास करून माझे पती सुहास भोसले, दिर चंद्रसेन भोसले, अरुणा भोसले या सर्वांचे योगदान व सहकार्य मोलाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.