PCMC News: प्राण्यांसाठी डॉक्टरांसह सुसज्ज पशु रुग्णवाहिका सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्राण्यांसाठी डॉक्टरांसह सुसज्ज अशी रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका प्राण्यांच्या सेवेत दाखल झाली आहे. पाळीव प्राण्यांसह भटक्या प्राण्यांना वेळेत आणि इच्छित स्थळी या रुग्णवाहिकेमुळे उपचार मिळणे शक्य होणार आहे.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून प्राण्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या रुग्णवाहिकेत प्राण्यांच्या उपचारासाठी लागणारे प्राथमिक साहित्यासह डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक असणार आहे. ही रुग्णवाहिका मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरणदेखील करणार आहे. हे लसीकरण करताना प्राणीमित्रांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे उपचारासह लसीकरण दोन्ही बाबी शक्य होणार आहे.

Chakan News: इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत उपाययोजना करण्याची मागणी

शहर सध्या वाढते आहे. शहरात पाळीव प्राणी संख्या मोठी आहे. तसेच शहरात भटके श्वान , जनावरेदेखील आहेत. अनेकदा घडलेल्या अपघातांमध्ये भटक्या प्राण्यांना इजा होते. अशावेळी त्यांना अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाही. तर काही आजाराने ग्रस्त झालेल्या प्राण्यांमुळे इतर प्राण्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या प्राण्यांना वेळेवर आणि इच्छित स्थळी उपचार आवश्यक असतात.

रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हे उपचार शक्य होणार आहे. सलाईन, लसीकरण, प्राथमिक उपचार यांची सोय रुग्णवाहिकेत असेल. प्राण्याची स्थिती पाहून त्याला आवश्यक उपचार देण्यात येतील. गरज वाटल्यास नेहरुनगर येथील डॉग शेल्टर मध्ये आवश्यकता वाटल्यास श्वानांना पुढील उपचारासाठी नेण्यात येईल असे पशुवैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.

या रुग्णवाहिकेच्या मदतीने शहरात ठिकठिकाणी लसीकरण सुरु आहे. पशुवैद्यकीय पथक रेबीज बाबत जागृती करत आहे. त्याअनुषंगाने भटक्या श्वानांवर लक्ष देत लसीकरण सुरु आहे. भटक्या श्वानांवर विशेष लक्ष देण्यासाठी शहरात कार्यरत असलेल्या प्राणीमित्रांचे सहाय्य होत असल्याचे उपायुक्त सचिन ढोले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.