Chakan News: इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत उपाययोजना करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना करावी अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सदस्य नितीन गोरे यांनी केली आहे. नितीन गोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची शुक्रवारी (दि.9) महापालिकेत भेट घेऊन या बाबतची मागणी केली आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषण संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दी जवळील इंद्रायणी प्रवाहा मध्ये प्रदूषण जास्त आढळते,खेड तालुक्यातील आळंदी,चाकण पंचक्रोशी परिसरातील गावांना याचे दुष्परिणाम जाणवत आहेत.आळंदीमध्ये भक्ताना दूषित पाणी प्यावे लागत आहे, त्यात स्नान करावे लागत आहे.त्यामुळे भाविक भक्तांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Khed News: दामदुपटीचे आमिष दाखवून मित्रानेच केली डॉक्टरची साडे पंधरा लाखांची फसवणूक

नितीन गोरे यांनी गेल्या पंधरवड्यात चाकण औद्योगिक वसाहतीत प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण बैठकही घेतली होती. प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना करावी असे गोरे यांनी आयुक्ताना निवेदन दिले आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महापालिका इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहेत? याची सविस्तर माहिती मागितली आहे. नितीन गोरे यांनी सांगितले कि, पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांच्याशी देखील यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली . लवकरच सर्व संबंधित संस्था,प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच पिंपरी चिंचवड महापालिका व एमआयडीसी मिळून इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्याबाबत संयुक्त बैठक घेणार आहे असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.