Wakad News: शस्त्र परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची साडे आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तरूण व्यावसायिकाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना म्हणजे आर्म लायसन्स हवे होते. मात्र हा परवाना मंत्रालयातून मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तरुणाची तब्ब्ल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार काळेवाडी येथे जानेवारी 2019 ते आजपर्यंत घडला.

याप्रकरणी प्रसाद उर्फ दिगंबर तुकाराम फुगे (वय 27 रा.भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राज उर्फ धनराज बाळू गायकवाड (वय 30 रा.लोहगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शोती तसेच बीस्कीट व सिगारेट यांचे डिस्ट्रीब्यूटर आहेत. त्यांचा व्यवसाय असल्याने त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना हवा होता. त्यासाठी त्यांनी गृह विभाग मुंबई मंत्रालय यांच्याकडे लेखी अर्ज देखील केला होता. यावेळी फिर्यादी यांचा मित्र नितीन भोसले याची ओळख सांगून आरोपी याने फिर्यादीला फोन करून तुमचा अर्ज मी मंजूर करून देतो असे सांगितले.

यासाठी फिर्यादी यांना आरोपी फिर्यादीचे मावस भाऊ मयूर गवळी यांच्या काळेवाडीतील घरी भेटले.यावेळी आरोपीने फिर्यादी ला सांगितले की, मी मुंबई मंत्रालयात कामाला आहे. मी गृहविभागातील कामे पाहतो. तुमची फाईल मला दिसली, मी शहरातील अनेक जणांना शस्त्र परवाना मिळवून दिला आहे.तुमचे काम पण मी पाच ते सहा महिन्यात करतो. असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्याने जानेवारी 2019 पासून ते आजपर्यंत फिर्यादी यांच्याकडे वेळोवेळी असे 8 लाख 63 हजार रुपये घेतले. मात्र परवाना काही दिली नाही. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.