Pimpri News : गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड येथे आठ हजार पोलीस तैनात

एमपीसी न्यूज – उद्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांचे सुमारे आठ हजार पोलीस तैनात आहेत.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान पुणे शहरात पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत.मानाच्या गणपती बरोबरच शहरातील किमान तीन हजार सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन होण्याचा अंदाज आहे.सुमारे 85 घाटांवर गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. पुणे शहरात गणपती विसर्जनाची मिरवणूका निघणार असल्यामुळे वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील 17 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, शहरात 15 प्रमुख घाट आहेत.या प्रत्येक घाटावर एक फायरमन, अग्निशमन अधिकारी व 2 जीवरक्षक तैनात असतील.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पिंपरी चिंचवड, चाकण, देहूरोड व तळेगाव दाभाडे ही शहरे तसेच हिंजवडी आयटी पार्क आणि इतर ग्रामीण परिसर यांचा समावेश होतो.गणेशोत्सव काळात एवढ्या मोठ्या क्षेत्राच्या बंदोबस्तासाठी आयुक्तालयामार्फत 50 पोलीस निरीक्षक, 150 सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, 1207 पोलीस अमलदार, 254 होम गार्डस व 4 राज्य राखीव पोलिसांच्या प्लॅटून्स तैनात असतील. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत स्वयंसेवक व विशेष पोलीस अधिकारी यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात येईल.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत गणेशोत्सव काळात वाहतूक नियमनासाठी 7 पोलीस निरीक्षक, 8 पोलीस उपनिरीक्षक/ सहाय्यक पोलीस निरीक्षक, 248 कर्मचारी व 30 होमगार्ड तैनात असतील.

किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी सांगितले की उद्या पिंपरी चिंचवड शहरात 30 विसर्जन घाटांवरती गणपती विसर्जन होणार आहे. यातील 10 प्रमुख घाट आहेत. या 30 घाटांवरती एकूण 60 फायरमन तैनात असतील. त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स व लाईफ रोप्स असतील. प्रमुख 3 ते 4 घाटांवर कोणी बुडाल्यास त्यांना वाचवण्यासाठी सेफ्टी बोट असतील.

MPC News Online Bappa Result :  ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर; जाणून घ्या चांदीचे नाणे जिंकणाऱ्या स्पर्धकांची नावे!

फायरमन कडे वॉकी टॉकी सेट्स, मोबाईल फोन्स संपर्क करण्यासाठी असतील. डिजास्टर मानजमेंट फोर्स  भोसरी,  थेरगाव बोट क्लब व वन्य पशु पक्षी संरक्षण संस्था सांगवी या तीन संस्था 35 ते 40 जीवरक्षक (लाईफगार्ड्स) पुरवतील व ते घाटांवरती तैनात असतील. तसेच मनपा क्रीडा विभागाचे 15 क्रीडा शिक्षक देखील घटनावर मदत करण्यासाठी तैनात असतील. तसेच 10 प्रमुख घाटांवरती प्रत्येकी एक ऍम्ब्युलन्स असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.