BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : घरात घुसून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – भांडी घासत असलेल्या महिलेजवळ येऊन भांडी घासण्याची पावडर दाखवण्याच्या बहाण्याने दोन जणांनी महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बनकरवस्ती मोशी येथे मंगळवारी (दि. 22) सकाळी घडली.

प्राजक्‍ता सागर आल्हाट (वय 21, रा. बनकर वस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास प्राजक्‍ता या घरात भांडी घासत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी आपल्याकडे भांडी घासण्याची पावडर असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी प्राजक्‍ता यांच्या घरातील एक डबा त्या पावडरने घासून दाखवत नंतर आरोपींनी स्वतःच्या हातातील अंगठीही घासून दाखविली. त्यानंतर आरोपींनी प्राजक्‍ता यांच्या गळ्यातील दागिने घासून दाखविण्यासाठी मागितले. मात्र, त्यांनी देण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे एक लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3