Pune : टोळक्याकडून इसमाला ऑफिसमध्ये घुसून धारदार हत्यारांनी मारहाण

एमपीसी न्यूज – टोळक्याकडून इसमाला ऑफिसमध्ये घुसून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.16) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी बायपास येथे वाघेश्वर पार्कींग यार्ड खांदवेनगर येथे घडली. याप्रकरणी विजय गायकवाड यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 5 जणांना अटक करण्यात आली असून अन्य 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत कुटे (30), मयूर वाघमारे (27), शहारुख शेख (24), हुसेन शेख (20), निजामुद्दीन शेख (19), सर्वजण राहता चंदननगर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी गायकवाड यांचे वाघेश्वर पार्कींग यार्ड खांदवेनगर येथे ऑफिस आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजता ते त्यांच्या भाचा आणि कामगारासह ऑफीसमध्ये असताना, आरोपी व त्यांच्या साथीदारांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये घुसून सर्वांना लाकडी काठ्या तसेच धारदार हत्यारांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी व त्यांचा भाचा गंभीर जखमी झाला असून ऑफिसचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फिर्यादींच्या बोटातील 50 हजार रुपयांची अंगठी गहाळ झाली आहे.

विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.