Entry of little Shivba: ‘स्वराज्यजननी जिजामाता’मध्ये छोट्या शिवबांची एन्ट्री

Entry of little Shivba in 'Swarajyajanani Jijamata' serial अनलॉक दोनच्या अंतर्गत मालिकांच्या चित्रीकरणास अटी शर्तींसह परवानगी मिळाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

एमपीसी न्यूज- ‘हर हर महादेव’ म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरुन येतो. छोट्या पडद्यावर सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणारी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि जडघडणीत त्यांच्या आईचा, जिजाऊ माँसाहेबांचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांना ‘स्वराज्यजननी जिजामाता’ म्हटलं जातं.

अनलॉक दोनच्या अंतर्गत मालिकांच्या चित्रीकरणास अटी शर्तींसह परवानगी मिळाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. दि.13 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

जिजाऊंनी स्वराज्याचा सिंह, रयतेचा राजा कसा घडवला याची कथा या मालिकेत मांडली आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशीच मालिकेतही शिवजन्म झाला आणि स्वराज्यबांधणीच्या प्रवासाला सुरुवात झाली.

मालिका आता काही वर्षे पुढे जात आहे आणि आता मालिकेत शिवाजी महाराजांची एन्ट्री झाली आहे. आर्यन रवींद्रनाथ लहामगे हा बालकलाकार छोट्या शिवबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी आर्यनने ‘एक होती राजकन्या’ आणि ‘सावित्रीजोती’ या मालिकेत अभिनय केला आहे.

शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या वेळेत त्यानं बरीच पुस्तकंही वाचून काढली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.