Sassoon Hospital : ससून हॉस्पिटलमध्ये चाललं तरी काय, लाखोंचे व्हेंटिलेटर्स भंगारात!

एमपीसी न्यूज – पुण्यातील ससुन हॉस्पिटल (Sassoon Hospital)  प्रशासनाचा गलथन कारभाराचा आणखी एक नमुना उघडकीस आला आहे. ससून हॉस्पिटलमधील 43 व्हेंटिलेटर विना वापर पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्हेंटिलेटरची कमतरता जाणवू लागल्यानंतर केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला शेकडो व्हेंटिलेटर दिले होते. त्यात 43 व्हेंटिलेटर हे पुणे शहराच्या वाट्याला आले होते. याचा सुरुवातीचा काही दिवसात वापर झाला मात्र त्यानंतर आता हे व्हेंटिलेटर मागील सात ते आठ महिन्यांपासून विना वापर पडून आहेत. 

 

Wakad News : वाकडमध्ये दोन ठिकाणी मंगळवारी झाडे पडली

 

कोरोनाचा जेव्हा भारतात शिरकाव झाला तेव्हा व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत होता. यानंतर केंद्र सरकारने पुढाकार घेऊन व्हेंटिलेटरचा पुरवठा राज्य सरकारला केला होता. त्यापैकी पुणे शहराच्या वाट्याला 43 व्हेंटिलेटर आले होते. सुरुवातीला मिळालेले 13 व्हेंटिलेटर महापालिकेच्या बाणेर येथील कोविड रुग्णालयात बसवण्यात आले. त्यानंतर मिळालेले 30 व्हेंटिलेटर ससून हॉस्पिटलला (Sassoon Hospital)  देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचा थोड्याफार प्रमाणात वापर झाला. परंतु मागील काही महिन्यांपासून ते आता बंद अवस्थेत आहे.

 

दरम्यान पीएम केअर फंडातून मिळालेले हे व्हेंटिलेटर सध्या तरी पुणे महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात वापरात येत नाहीत. तर ससूनमध्ये असलेले 90 टक्के व्हेंटिलेटर विना वापर पडून आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा चुरडा झाल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.