Trupti Desai : भाजप नेत्याची बेडरूममधील क्लिप व्हायरल, तृप्ती देसाई संतापल्या, म्हणाल्या..

एमपीसी न्यूज – सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरूममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका महिलेनेच हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला सुरुवातीला स्वतःचे नाव सांगते आणि त्यानंतर बेडरूममध्ये बसलेल्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे कॅमेरा फिरवून या माणसाने मला फसवलंय असं सांगताना दिसते. हा बायको सोबत संबंध ठेवून माझ्यासोबतही संबंध ठेवतोय, लग्न करतोय असं म्हणताना ही महिला या व्हिडिओ दिसतीये. या व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई  (Trupti Desai) यांनी देखील आता श्रीकांत देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. सामान्य जनता तुम्हाला चांगले समजते, अशी कृत्य केली तर लोक चपलांनी मारतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

 

तृप्ती देसाई म्हणाल्या, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा हा व्हिडिओ आहे. हा श्रीकांत देशमुख मुंबईत जातो, मला हनी ट्रॅपमध्ये अडकवले जाणार आहे असे सांगतो. अरे आणि ट्रॅपमध्ये कोण टाकतो. ज्यांना अनैतिक संबंध ठेवण्याची खुमखुमी असते असेच हनी ट्रॅपमध्ये अडकतात. काही दिवसांपूर्वी एका कीर्तनकाराचा व्हिडिओ भारी झाला होता आणि त्यानंतर आता एका राजकीय नेत्याचा होऊ लागला आहे. अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्हाला चांगले समजले जाते. अशी कृत्य करायला लागला तर लोक तुम्हाला चपलांनी मारतील, अशी टीका तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केली आहे.

 

Sassoon Hospital : ससून हॉस्पिटलमध्ये चाललं तरी काय, लाखोंचे व्हेंटिलेटर्स भंगारात!

दरम्यान, भाजपने तातडीने श्रीकांत देशमुख यांची पदावरून हाकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देसाई यांनी यावेळी केली. राजकारण्यांना आपण सन्मान दिला पाहिजे. परंतु कोणी चुकत असतील तर त्यांच्या विरोधात आवाजही उठवला पाहिजे तरच आपल्या घरातील मुली सुरक्षित राहतील, असं त्या यावेळी म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.