NASA : नासाने केली कमाल! महाकाय दुर्बिण जेम्स वेब ने टिपले अवकाशातील दूरवरचे तारे व दीर्घिकांचे आत्तापर्यंतचे सुस्पष्ट छायाचित्र

एमपीसी न्यूज,  (श्याम मालपोटे) – अवकाशातील अनेक प्रकाशवर्ष दूर वर असलेले तारे व दीर्घिका आता अधिकच सुस्पष्ट व रंगीत स्वरूपात दिसणार आहे कारण नासाने  (NASA) त्यांचा आत्तापर्यंतचा सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप ‘जेम्स वेब’ अंतराळात पाठविला आहे. जेम्स वेब हा याआधी असलेला हबल टेलिस्कोपपेक्षा अधिक प्रभावशाली आहे असा दावा नासाने केला आहे. मंगळवारी (दि.12) जेम्स वेब दुर्बिणीने दूरवरचे तारे, नवीन दीर्घिका आणि बरेच काही फोटो टिपले आहेत. 

 

 

नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीतून अवकाशाचे एकापेक्षा एक रंगीत फोटो पहिल्यांदाच जगासमोर येत आहेत.यापूर्वीच्या हबल दुर्बिणीने जी चित्र जगाला अनेक वर्षांपूर्वी दाखविली होती, त्यापेक्षा कित्येक पट अधिक स्पष्ट चित्र आता जेम्स वेब नावाच्या या महाकाय दुर्बिणीतून जगाला पाहायला मिळत आहेत.

 

Sassoon Hospital : ससून हॉस्पिटलमध्ये चाललं तरी काय, लाखोंचे व्हेंटिलेटर्स भंगारात!

 

10 अब्जडॉलर्स खर्चून बनवलेली जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचं प्रक्षेपण गेल्या वर्षी 25 डिसेंबरला करण्यात आलं होतं. या दुर्बिणीनं

 

 

अंतराळात हबल टेलिस्कोपची जागा घेतली. हबल दुर्बिणीपेक्षा जास्त क्षमतेची ही दुर्बीण तारका समुहांचे वेगळे, जास्त स्पष्ट फोटो संशोधकांना पाठवेल (NASA) आणि त्यांच्या मदतीने विश्वाची रहस्य आपल्यासमोर उलगडतील, अशी संशोधकांची अपेक्षा होती. जेम्स वेब टेलिस्कोपची रुंदी 6.5 मीटर आहे, ज्यामध्ये सोनेरी आरसा आहे आणि अतिशय संवेदनशील असं इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंट आहे.

 

Trupti Desai : भाजप नेत्याची बेडरूममधील क्लिप व्हायरल, तृप्ती देसाई संतापल्या, म्हणाल्या..

 

 

मंगळवारी (12जुलै) नासाकडून  (NASA) जेम्स वेबने पाठवलेली प्रसिद्ध केलेली छायाचित्रे खालीलप्रमाणे, सदर्न रिंग- हा वायू आणि धुळीचा एक महाकाय गोळा आहे, जो सतत मोठा होतोय. सदर्न रिंग या गोळ्याचा व्यास साधारण अर्धा प्रकाशवर्ष आहे आणि तो पृथ्वीपासून सुमारे 2000 प्रकाशवर्ष दूर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.