Lonaval Rain : लोणावळ्यात 24 तासात 213 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज – गेल्या काही आठवड्यांपासून लोणावळ्यात सुरु असलेला जोरदार पाऊस  (Lonaval Rain) कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मंगळवारी देखील शहरात 24 तासात तब्बल 213 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

 

पावसाचा जोर कायम राहिल्यास लोणावळा धरणाच्या (Lonaval Rain)  सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा टाटा कंपनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिला आहे. लोणावळा शहरात आजपर्यंत 1735 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

 

 

NASA : नासाने केली कमाल! महाकाय दुर्बिण जेम्स वेब ने टिपले अवकाशातील दूरवरचे तारे व दीर्घिकांचे आत्तापर्यंतचे सुस्पष्ट छायाचित्र

 

गेल्या वर्षी आजपर्यंत 1306 मिमी. पाऊस झाला होता.यंदा जुन महिन्यात पावसाने (Lonaval Rain) ओढ दिल्याने पाऊस पडणार की नाही अशी चिंता वाटत होती. मात्र जुलैत सुरु झालेल्या पावसाने सर्व सरासरी भरुन काढली असून अवघ्या आठ दिवसांत मावळ तालुक्यातील सर्व धरणे निम्म्याने भरली आहेत.

 

गेल्या आठ दिवसांत म्हणजेच पाच जुलै ते 12 जुलै या कालावधीत शहरात तब्बल 1650 मिमी पाऊस झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.