Akurdi News : समाज सेवा केंद्रात गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील जानकीदेवी बजाज समाजसेवा केंद्राच्या वतीने महिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले. चाळीस महिला उद्योजकांनी या प्रदर्शनात विविध स्टॉल लावले.

आपल्याच परिसरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. 85 किलोमीटर पायी दुर्ग भ्रमण करून शिवज्योत प्रस्थापीत करणाऱ्या जिजाऊच्या लेकींच्या भक्ती दहिफळे, नेत्रा ढगे, सानिका माने, वृदुला पवार आणि उद्योजिका निर्विवाद मासलेच्या संचालिका उत्कर्षा कुलकर्णी, उर्मिला काळभोर, फेबिता शेख या तीन महिलांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

समाज सेवा केंद्राच्या सहाय्यक व्यवस्थापिका स्वाती देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जानकी देवी बजाज ग्राम विकास या संस्थेचे सेक्रेटरी पी मुखर्जी हे या सोहळ्याला आवर्जून उपस्थीत होते.

महिलांनी ठरवलं तर त्या उत्तम उद्योजिका होऊ शकतात आणि या प्रदर्शनाच्या निमीत्ताने तुम्ही ते सिद्ध करून दाखवले आहे, अशा भावना सर्व पाहुण्यांनी व्यक्त केल्या. दुर्ग भ्रमण करणाऱ्या मुलींचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. उत्तम दर्जा कमी किंमत ही प्रदर्शनाची खासियत आहे. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.