Pune : तस्करी करून भारतात आणलेले विदेशी पक्षी जप्त

एमपीसी न्यूज – पुणे कस्टम्सच्या अधिका-र्यांच्या मदतीने रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय)च्या निदेशालयाने भारतात तस्करी करून आणलेले विदेशी पक्षी आज (दि.8) वडगाव शेरी येथील रहिवासी डॉमिनिक सेक्वायरा यांच्या परिसरातून जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे कस्टम्सच्या अधिका-यांच्या मदतीने रेव्हेन्यू इंटेलिजेंस(डीआरआय)च्या निदेशालयाने बेकायदेशीरपणे भारतात तस्करी करून आणलेले विदेशी पक्षी जप्त केले आहेत. तपासणी केल्यानंतर परकीय विदेशी पक्ष्यांमध्ये 15 आगापॉर्नीस प्रजातींचे मूळ आफ्रिकेतील व लव्ह बर्ड म्हणून ओळखले जाणारे पक्षी, 1 सन पॅराकीट प्रजातीचा मूळ दक्षिण अमेरिकेतील व सनकॉन्चर म्हणून ओळखले जाणारा, मूळ फिलिपाईन्स येथील 2 ग्रेट बिल्ड् पॅरट व एक इंडोनेशियन व्हाइट कॉकाटू,
असे एकूण 19 विदेशी पक्षी जप्त केले.

वरील उल्लेखित पक्ष्यांची किंमत उच्च असून त्यांची तस्करी करून या पक्ष्यांना विकले जाते. हे सर्व पक्षी अवैध माध्यमातून अवैधरित्या भारतात आयात केले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व पक्ष्यांना राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाकडे सुरक्षित ताब्यात देण्याच्या उद्देशाने सुपूर्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.