Express Way : एक्सप्रेस हायेववर प्रात:विधीसाठी थांबलेल्या युवकाला लुटले

एमपीसी न्यूज – पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Express Way) मोटार थांबवून बाजूला प्रात:विधीसाठी गेलेल्या तरुणाला खाली पाडून चोरट्यांनी लुटले. 14 हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. ही घटना शुक्रवार (दि. 10) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अजय लिंबाजी गनगे (वय 30, रा. मोहळ, सोलापूर) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Kidnapping Minor Girl : पळवून नेऊन अल्पवयीन मुलशी लग्न,आरोपी अटकेत

 

अजय हा शुक्रवारी पहाटे मोटारीतून हायवेवरुन येत होता. पहाटे तीनच्या सुमारास मोटार हायवेच्या (Express Way) बाजूला उभी केली आणि अजय बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत प्रात:विधीसाठी गेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून तीन चोरटे तिथे आले. चोरट्यांनी अजय याला खाली पाडले. त्याच्या खिशातील 14 हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल फोन व रोकड जरबदस्तीने काढून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.