PCMC News: बक्षीस योजनेस गुणवंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंत दहावी आणि बारावीच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना बक्षिस रक्कम देण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध प्रकारच्या लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये इतर कल्याणकारी योजने अंतर्गत दहावी मध्ये 80% ते 90% व 90% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (SSC Board) अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील व शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) अंतर्गत शाळांमधील विद्यार्थी / विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम देणे. बारावी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या महाराष्ट्र राज्य मंडळ (HSC Board) अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना बक्षीस रक्कम देणे, या योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती. त्याची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येतील.

Narayan Rane : आधीच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते; आता महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक उद्योग वेटिंगवर – नारायण राणे

विद्यार्थी अणि पालकांच्या मागणीनुसार योजने मध्ये सुधारीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार CBSC Board,ICSC Board अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील / महाविद्यालयातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना देखील या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या नमुद केलेल्या अटी व शर्तीनुसार आवश्यक ती कागदपत्रे महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.  ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे अर्ज अर्जदार व्यक्ती, मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा नागरी सुविधा केंद्रांमार्फत विहीत शुल्क भरुन देखील भरता येतील, असे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.