Lunar Eclipse : आळंदी मध्ये इंद्रायणी घाटावर खंडग्रास चंद्रग्रहणानिमित्त जप तप विधी

एमपीसी न्यूज : चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण खगोलप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण दि.8 नोव्हेंबर रोजी खगोलप्रेमींनी अनुभवलं. भारतातील विविध भागातील ठिक ठिकाणांवरून खग्रास तर काही भागातून खंडग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळालं.आळंदी मध्ये या ग्रहण काळात सायंकाळी 5 :57 ते सायं .6:30 वा. पर्यंत माऊली मंदिरात माऊलींच्या समाधीवर जलाभिषेकाची भाविकांना सोय करण्यात आली होती.

या ग्रहण काळात इंद्रायणी घाटावर काही भाविक नागरिक धार्मिक परंपरेने जप,तप, यज्ञ क्रिया व मंत्रोच्चार करताना दिसत होते.नदीपात्रात काही नागरिक उभे राहत डोळे मिटवून हात जोडून, काही तांब्याचे जलपात्र हातात घेत तर काही हाताच्या ओंजळीत जल घेऊन नदीपात्रात जलर्पण करत होते.ग्रहण काळ संपल्यानंतर अनेक भाविकांनी इंद्रायणी नदीत स्नान केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.