Extortion case : बेकायदेशीर सावकारी व कर्जवसुली करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या सावकारी (Extortion case) करत 15 टक्के व्याजदराने कर्ज वसुली करणाऱ्या सावकारावर खंडणी विरोधी पथक दोन यांनी केली आहे.

रवि नरसिंग पवार (वय 42 रा.हडपसर) व त्याचा साथीदार अशोक वसंत ठाकरे (वय 27 रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचा मित्र या दोघांनी मिळून रवी पवार याच्याकडून मे 2019 रोजी 1 लाख रुपये 15 टक्के व्याजदराने घेतले होते. (Extortion case) त्या मोबदल्यात तक्रारदाराने 3  लाख 30 हजार रुपये रोख घेऊनही पवार व ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने 1 लाख 56 हजार रुपये असे एकूण 4 लाख 86 हजार रुपये घेतले. तरीही तक्रारदाराच्या मुलाचे अपहरण करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली व आणखी मुद्दल व व्याज असे एकूण 40 हजार रुपये देण्याची मागणी केली. यावरून तक्रारदाराने अखेर पोलिसांत तक्रार दिली.

G-20 summit : पुढील वर्षी नियोजित जी-20 परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठक

या तक्रारीवरून खंडणी विरोधी पथकाने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढिल तपास हडपसर पोलीस करत आहेत.(Extortion case) ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अमंलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनेद साळुंके, राहूल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सौदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे व आशा कोळेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.