Pimpri : शेतकर्‍यांनी शेतीपुरक व्यवसायाची कास धरावी – नेवाळे

एमपीसी न्यूज – शेती व दुग्ध पालनासोबत शेतकरी वर्गाने जोड धंद्यांची कास धरावी असे आवाहन पुणे जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले. वाकसई विविध कार्यकारी सोसायटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने नेवाळे वाकसई गावात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशिकर, सरपंच दीपक काशिकर, वाकसई विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण शेलार, उपाध्यक्ष विजय देसाई, संचालक किसन आहेर, धोंडू शिंदे, एकनाथ शेलार, आत्माराम येवले, माजी नगरसेवक नारायण पाळेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल केदारी, सोशल मिडिया सेलचे मावळ तालुकाध्यक्ष अतुल सातकर, विविध कार्यकारी सोसायट्यांचे सचिव गणपत भानुसघरे, माजी सरपंच अंकूश देशमुख, अॅड. जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे, कैलास काशिकर, पोलीस पाटील सुर्यकांत विकारी, बाळासाहेब येवले, अशोक रोकडे, शाम विकारी, हनुमंत आहेर, सुनिता केदारी हे मान्यवर उपस्थित होते.
नेवाळे म्हणाले शेतकरी वर्गाने पारंपारिक शेती व दुग्ध व्यावसायाला पुरक असा जोडधंदा केल्यास ग्रामीण जिवनमान उंचविण्यास मदत होईल. तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांनी यांनी देखिल शेती सोबत या जोड व्यावसायांकरिता शेतकरी वर्गाला कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1