Dehuroad : शौचालयाच्या खड्ड्यावरून वाद; जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – शौचालयासाठी खड्डा खोदताना शेजारी राहणा-या तिघांनी खड्डा न खोदण्यास बजावत खोदकाम करणा-यासोबत भांडण केले. तसेच खोदणा-यासह मुलांना देखील मारणार असल्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (दि. 26) दुपारी साडेतीनच्या सुमारास तळवडे येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

शाम प्रीतम सिंधवानी (वय 54, रा. सेक्टर नंबर 27, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बिन्नर (पूर्ण नाव माहिती नाही), त्याची पत्नी आणि अन्य दोन जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम यांची तळवडे येथे कंपनी आहे. ते कंपनीतील कामगार आणि इतर लोकांसाठी शौचालय बांधत आहेत. त्यासाठी त्यांनी बुधवारी दुपारी खड्डा खोदण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी येऊन दंगा केला. ‘तुम्ही खड्डा घेऊ नका, ही जागा आमची आहे.’ असे म्हणत आरोपींनी शाम यांच्या कंपनीसमोर उभा असलेल्या टेम्पोवर दगडफेक केली. तुम्ही कंपनी बंद करा अन्यथा तुमच्यासह तुमच्या मुलांना देखील जीवे मारू, अशी धमकी देखील आरोपींनी शाम यांना दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.