Sangavi Crime News : बैलपोळ्याच्या मिरवणुकीत मारामारी, दोन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – बैलपोळ्याच्या  मिरवणुकीवेळी झालेल्या मारामारीत प दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणपती चौक, विशालनगर, पिंपळे निलख येथे गुरूवारी (दि.07) बैलपोळ्याच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी अनिकेत अजय खरात (वय 24, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राम बावधने, लक्ष्मण बावधने व शुभम बावधने (रा. जगताप डेअरी, पिंपळे निलख) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी चौधे याने बैलपोळ्यांच्या मिरवणुकी दरम्यान आरोपींना खुन्नस दिली याचा राग मनात धरून वाईट शिवीगाळ केली तसेच, मारहाण केल्याचे अनिकेत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच, शुभम लक्ष्मण बावधने (वय 20, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंटी चौंधे, गणेश सावंत आणि मंगेश कस्पटे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैलपोळ्याच्या मिरवणुकीदरम्यान आरोपीने या मिरवणुकीत चारचाकी घुसवली. त्यावरून आरोपींना गाडी का घुसवली असे विचारले असता राग आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे करित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.