Baner : दोन कोटींपेक्षा अधिक असलेला कर न भरल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पावणे दोन कोटींपेक्षा अधिक असलेला कर नोटीसा देऊन देखील न भरल्यामुळे शासनाची फसवणूक करणा-या बाणेर येथील मेसर्स युलीक इंन्टरटेक प्रायव्हेट लिमिटेड साई हेरिटेज या कंपनीच्या तिघा जणांवर काल गुरूवारी (दि.25) फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकाश कुलकर्णी (वय 41, रा. पिंपळे – निलख) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील बांधकाम मटेरियल पुरवठा करणारी मेसर्स युलीक इंन्टरटेक प्रायव्हेट लिमिटेड साई हेरिटेज या कंपनीचे डायरेक्टर यांनी व्यवसाय करताना रचनेनुसार कर गोळा करून तो शासनास भरणे गरजेचे असताना त्यांनी वेळोवेळी जमा होणा-या व्यवसायातील रकमेवरील मुल्यवर्धित कर महाराष्ट्र शासनास जमा करणे बंधनकारक असताना त्यांनी 2011 ते 2014 या कालावधी पर्यंतची आजपर्यंत व्याजासहित एकूण 1 कोटी 86 लाख 26 हजार 6 रूपये एवढी रक्कम फिर्यादी यांनी कार्यालयातून कायदेशीर नोटीस देऊन देखील मुल्यवर्धित कराची रक्कम न भरता शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कंपनीच्या तिघाजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चतु:श्रुंगी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.