Deccan – वाहतुकीचे नियम मोडून पोलिसांशी हुज्जत घालणा-या इसमाला अटक

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम मोडून पोलिसांशी हुज्जत घालणा-या इसमाला अटक केल्याची घटना काल गुरूवारी (दि.25) जंगली महाराज रोडवर घडली आहे.

याप्रकरणी डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस नाईक प्रमोद कोकणे यांनी फिर्याद दिली आहे.

रविंद्र श्रीधर जाधव (वय 46, रा. विश्रांतवाडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  यातील फिर्यादी हे जंगली महाराज रोड येथील सुभद्रा हॉटेलसमोर वाहतुकीचे नियमन करत असताना रविंद्र जाधव याने वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून त्याची दूचाकी भरधाव वेगात चालवून विरूद्द दिशेत घातली. त्यावेळी  फिर्यादी यांनी त्याला आडवले असता त्याने फिर्यादीशी हुज्जत घालून त्यांच्याशी आरेरावीची भाषा वापरत तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलत फिर्यादींच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केलाय

.
याप्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.