Pune : फोनवर धमकी देऊन दहा लाखांची खंडणी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फोन करुन दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या अज्ञाता विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काल गुरुवारी (दि 25)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अनिल वामन भिडे (वय 55, रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. व त्यांनी आपण मुंबई येथून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. व त्याने एका इसमाला पकडले असून त्याच्याकडे रिव्हालव्हर मिळाले आहे व ते रिव्हालव्हर त्याने तुमच्यासाठी खरेदी केले आहे असे त्याने सांगितल्यामुळे आम्ही तुमच्याकडे येणार आहे असे सांगितले व आम्ही तुमच्याकडे येऊन अटक करू असे सांगून 10 लाखांची खंडणी मागितली. 2 ते 3 वेळा फिर्यादीला असे फोन आल्यामुळे त्यांनी अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पुढील तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.