Katraj : राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चंदनाच्या झाडाच्या ओंडक्याची चोरी

एमपीसी न्यूज – चंदनाच्या झाडाच्या ओंडक्याची चोरी झाल्याची घटना काल (दि 25) पहाटे दोनच्या दरम्यान कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहालयात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान मोर पिंजरा किचन गेट खंदकाच्या रोडच्या भागातील चंदनाचे झाड काल (दि 25) पहाटे दोनच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने कशाच्यातरी सहाय्याने कापले. चंदन असलेला 4 हजार रुपये किमतीचा लाकडी ओंडक्याचा आतील भाग चोरी करुन नेला आहे. याप्रकरणी प्रदीप बदगुडे (वय 46, पुणे मनपा सुरक्षा विभाग) यांनी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 
पुढील तपास भारती विदयापीठ पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.