Rahatani : चोर आला…चोरी केली …पण पळताना गडी सापडला

एमपीसी न्यूज- असं म्हणतात चोरी करणं ही सुद्धा एक कला आहे ती प्रत्येकाला (Rahatani) जमतेच अस नाही. याचीच प्रचिती देणारा एक किस्सा रहाटणी परिसरातील नखाते वस्ती येथे घडला आहे. त्याचं झालं असं चोराने शक्कल लावून घरात चोरी केली मात्र पळून जाताना तो पडला आणि पोलिसांच्या तावडीत अडकला हा सारा प्रकार मंगळवारी (दी.8)  घडला आहे.

पंकज दिलीप पवार (वय 32 चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.  याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्यादी आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा होणार माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने आला. यासाठी त्याने नामी शक्कल लावली. त्याने बाल्कनीतील उघड्या खिडकीत हात घालून घराच्या दाराची कढी आतून उघडली. त्यामुळे तो घरात सहज प्रवेश करू शकला.

मात्र यावेळी फिर्यादी या घरातच होत्या त्याने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 12 हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. आता चोरी झाली मात्र पळून जाण्यासाठी त्याने थेट बाल्कनीतून उडी मारून जाण्याचा मार्ग निवडला.

पठ्याने उडी मारली देखील मात्र यामध्ये तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. तो पडल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. वाकड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत. या घटनेवरून चोरी ही नसे सोपी असेच म्हणावं (Rahatani) लागेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.