Chikhali : साने चौकात अल्पवयीन मुलांचा राडा; जबरी चोरीसाठी केला दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – जबरी चोरी करण्यासाठी चार अल्पवयीन मुलांनी दोन जणांवर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला केला. तसेच सात जणांचे मोबाइल, एकाची दुचाकी हिसकावून (Chikhali) घेतली. तसेच आरडा ओरडा करीत वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास साने चौक, चिखली येथे घडली.

Rahatani : चोर आला…चोरी केली …पण पळताना गडी सापडला

पोलीस उपनिरीक्षक विवेक विनायक कुमटकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री चार अल्पवयीन मुलांनी एकत्र येत रस्त्याने जाणाऱ्या सात नागरिकांचे 28 हजार रुपये किंमतीचे सात मोबाइल कोयत्याचा धाक दाखवून हिसकावले. जे नागरिक विरोध करीत होते त्यांच्यावर कोयत्याने वार केले. अल्पवयीन मुलांनी दोन जणांवर कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर या मुलांनी एका नागरिकाची 80 हजार रुपयांची दुचाकी हिसकावून घेतली. तसेच आरडा-ओरडा करीत रस्त्यावरील दुचाकी गाड्यांचे नुकसान करीत दहशत निर्माण केली. चिखली पोलीस तपास (Chikhali) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.